Saturday, March 16, 2019


गेले २० -२२ वर्षा पूर्वी याच शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संगीतकार मित्र संजय गीते यांचे  सोबत गेदरिंगला आलो  होतो आज येथे महाविद्यालयीन शिक्षक म्हणुन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या फैकल्टी डेवलप्मेंट  प्रोग्रामला गेली ७ दिवस आहे हा आगला आनद। ....... 

Tuesday, April 24, 2018

‘हा’ निसर्ग, मानवविरोधी शिक्षणपसारा कशासाठी, कुणासाठी?











आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नामवन्त अर्थतज्ञ माजी सदस्य महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ प्रा .एच् .एम्.  देसरड़ा  यांनी  ग्रंथालयात भेट दिली त्यांचा हा  लेख खुप महत्वपूर्ण आहे आज मानव आणि निसर्ग यांची समाज विकासाची सम्यक दृष्टी  घडविणारा हा  लेख आपल्यासाठी त्यांचे परवानगी घेऊन पोस्ट करीत आहे। ......... 

‘हा’ निसर्ग, मानवविरोधी शिक्षणपसारा कशासाठी, कुणासाठी?

भारतात रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी एकूण नैतिक व भौतिक बाबींचा साकल्याने विचार करून श्रममूल्य व कलाकौशल्याचा मेळ घालणाऱ्या शिक्षणप्रणालीचा आग्रह धरला.


प्रा.एच.एम. देसरडा
नामवन्त अर्थतज्ञ माजी सदस्य महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ 

मानवाला विवेकी, संवेदनशील, संस्कृत, सहिष्णू, तसेच समस्त जीवसृष्टीचे उन्नयन व निसर्गव्यवस्थेचे संरक्षण, संवर्धनार्थ दिशादृष्टी व कौशल्य लाभण्यासाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्ग, मानव व समाजाचे परस्परावलंबन नीट लक्षात घेऊन समतामूलक शाश्वत विकास हे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षणाचा आशय, रचना, दिशादृष्टी मुक्रर करणे हे धोरणकर्ते, शिक्षणाचे व्यवस्थापक व शिक्षकांचे दायित्व आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या मते शिक्षणाचे प्रयोजन व्यक्तीला समाजविकासाची सम्यक दृष्टी (व्हिजन), जीवन उन्नत करण्यासाठी मूल्ये (व्हॅल्युज), तसेच उपजीविकेसाठी उत्पादकीय आणि सेवाप्रवणकौशल्ये (स्किल्स) प्रदान करणे हे आहे. निसर्गरचनेचे सम्यक आकलन व पूज्यभाव हा शिक्षणाचा स्थायीभाव असावयास हवा.
भारतात रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी एकूण नैतिक व भौतिक बाबींचा साकल्याने विचार करून श्रममूल्य व कलाकौशल्याचा मेळ घालणाऱ्या शिक्षणप्रणालीचा आग्रह धरला. नई तालीमच्या मूळ संकल्पनेबरहुकूम गांधीजींनी गुजरात विद्यापीठाची आणि जीवन अधिक संस्कृत व प्रगत करण्यासाठी गुरुदेव टागोर यांनी शांतिनिकेतन व श्रीनिकेतनची स्थापना केली होती. पदवी अगर प्रमाणपत्र बहाल करणारे नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण असा त्याचा गाभा होता. होता असेच म्हणावे लागेल. कारण आता तेथेही संस्थाचालकांना श्रम नको. पाश्चात्त्य धाटणीचे औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, शहरीकरण हाच वांच्छित विकास मानून त्याला अनुरूप शिक्षण हेच उद्दिष्ट मानले.

महाराष्ट्राची शैक्षणिक वाटचाल
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसाहतिक राजवटीच्या अमलातदेखील महाराष्ट्रातील लोकनेते, समाजधुरीण, समाजसुधारकांनी शिक्षणाला अव्वल स्थान दिले. शाहू, फुले, आंबेडकर, महर्षी कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांनी दलित, स्त्रिया, शेतकरी या कष्टकरी बहुजनांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. ठक्करबप्पा व अन्य काहींनी आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढल्या. या कालखंडात इंग्रज राज्यकर्ते व मिशनºयांनी शाळा, महाविद्यालये नि विद्यापीठ स्थापन केले होते. यासारख्या द्रष्ट्या मंडळींच्या पुढाकारामुळे स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: १९६० साली महाराष्टÑ राज्य निर्मितीनंतर शैक्षणिक शिष्यवृत्ती व सवलतीमुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा वेगाने विस्तार झाला.
आजमितीला महाराष्टÑात एक लाख ३३ हजार शाळा, सात हजार महाविद्यालये, २२ राज्य विद्यापीठे, एक केंद्रीय विद्यापीठ, २१ अभिमत विद्यापीठे आणि चार खासगी विद्यापीठे आहेत. शालेय, उच्च, व्यावसायिक शिक्षणावर २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्य सरकारने ६० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे सरकारी खर्च ‘शिक्षणासाठी’ होतो. याखेरीज विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अन्य व्यावसायिक महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे यात शिकणाºया विद्यार्थ्यांवर त्यांचे पालक किमान ४० हजार कोटी रुपये खर्च करतात. याचा अर्थ सरकार व समाजाचा शिक्षणासाठी होणारा खर्च एक लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तात्पर्य, शिक्षण हा एक मोठा उद्योग, व्यवसाय असून, त्यावर भला मोठा सार्वजनिक आणि खासगी खर्च होतो.
कोठारी आयोगाने शिक्षणाला मानवसंसाधन गुंतवणूक मानून ‘राष्ट्रीय विकासासाठी शिक्षण’ यावर भर दिला होता. त्यानंतरच्या ५२ वर्षांत जो लक्षणीय विस्तार झाला त्याची आजघडीला उपलब्धी नेमकी काय आहे?

गुणवत्तेचे तीनतेरा
देशपातळीवर शालेय शिक्षणाची काय स्थिती आहे, त्याचे सर्वेक्षण ‘प्रथम’ नावाची संस्था २००५ पासून करीत असून, दरवर्षी त्याचा अहवाल प्रकाशित होतो. वृत्तपत्रात त्याची चर्चा होते. महाराष्टÑ सरकारनेदेखील स्वतंत्र मूल्यमापन केले आहे. या दोन्हीतून जी वस्तुस्थिती चव्हाट्यावर आली ती अत्यंत धक्कादायक आहे. आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्याला स्वभाषेतील दुसरीचे पुस्तक नीट वाचता येत नाही; साधी बेरीज-वजावाकी, गुणाकार, भागाकार करता येत नाही! हे झाले शालेय शिक्षणाचे. उच्चशिक्षणाची (?) स्थिती तर अधिकच विदारक आहे. एक तर मुळात भारताचे एकही विद्यापीठ जगातील अव्वल २०० विद्यापीठांत नाही! साहजिकच ‘उच्चशिक्षिततेची’ शेखी मिरविणाºया विद्यापीठांची व मी मी म्हणणाºया विद्वत्जनांची कलई उतरली! तरी पण सुटाबुटात देशी-विदेशी मिरवण्यात मश्गूल आहेत!

आपल्या देशकाल वास्तवाला यथार्थ असे मूल्यमापन केले जावे. अशी मखलाशी आपल्या विद्यापीठीय पंडितांनी सरकारकडे केली. होय, तसं केलं गेलं. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या संस्थात्मक मूल्यमापन व्यवस्थेद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने भारतातील ९०० विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात पहिल्या दीडशेत महाराष्टÑातील केवळ सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ १६ व्या क्रमाकांवर आहे. १६० वर्षांपूर्वी स्थापन झालेले भारतातील आद्य विद्यापीठांपैकी एक असलेले मुंबई विद्यापीठदेखील नाही! मुंबई विद्यापीठाचा वार्षिक खर्च ६०० कोटींहून अधिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२० कोटी; राज्यातील इतर प्रादेशिक विद्यापीठांचे बजेट १०० ते ३०० कोटी रुपयांच्या आसपास आहे?

लठ्ठ पगाराचे कुरण
यासंदर्भात एका बाबीचा निर्देश करणे आवश्यक आहे, की शिक्षणाच्या नावाने जो खर्च होतो त्यात ८० टक्के पगार व आस्थापना खर्च आहे. शाळेतील व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकाला ३० ते ६०-७० हजार, वरिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक व प्राचार्य, तसेच विद्यापीठातील अध्यापक-प्राध्यापकांना एक लाख ते अडीच लाख, असे पगार आहेत. खेरीज चर्चा परिसंवाद, परिषदांच्या निमित्ताने सार्वजनिक खर्चाने देशी-विदेशी पर्यटनाची सोय! वर्षातून शंभर दिवसदेखील ‘शिकविण्याचे’ काम नाही. मात्र, विज्ञान व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी गावोगाव कोचिंग क्लासेसची दुकाने राजरोसपणे चालली आहेत! भरीस भर म्हणजे इंग्रजी शाळांचा सुळसुळाट! एकंदरीत शिक्षणाचा बाजार, धंदा बरकतीत चालला असून, त्यात शिक्षण नावाचा काही पदार्थ शोधणे म्हणजे कोळशाच्या खदानीत संगमरवराचा शोध...

स्त्रोत :लोकमत नाशिक संपादकीय  

Tuesday, March 7, 2017

जागतिक  महिला दिनाच्या हार्दिक शुभकामना। 

Tuesday, May 10, 2016



आरुष सोबत एक आनंदी क्षण।

Tuesday, June 16, 2015

मा. राज्यपाल तथा कुलपति महाराष्ट्र राज्य मा. सी. विद्यासागर राव , मा .ना .गिरीश महाजन जलसंपदा मंत्री व् पालक मंत्री नाशिक मा.कुलगुरु  डॉ .माणिकराव  साळुंखे यांची विद्यापीठ ग्रंथालयास भेट। ६ जून २०१५

छाया : राजेश बर्वे 


Wednesday, February 27, 2013

जागतिक मराठी भाषा  दिन : २७ .२ . २ ० १ ३

आदरणीय कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन















प्रकाश बर्वे 

Monday, September 3, 2012


   विद्या पीठ  अनुदान आयोगाचे मुंबई विद्यापीठ  येथील ACADEMIC STAFF COLLEGE शिक्षक विद्या प्रबोधिनी चे अंतर्गत ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयाचे प्रबोधन वर्गा अंतर्गत जोशी बेडकर महाविद्यालय ठाणे

२४।०८।२०१२  १३।०९।२०१२ सह भागी  प्राध्यापक आणि अनुभवी ग्रंथपाल  यांचे BLOG आपले माहिती आणि संदर्भां साठी :

१।संतोष चंद्रशेखर हुलागबली 
http://nkclibrary.blogspot.in/









                                            २।डॉ .सारिका सावंत
                                           http://lisrefreshercourse2012.blogspot.in/2012/08/welcome-to-blog.html





 
कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग चे  प्रेसिडेंट व सी.ई.ओ सर जॉन डेनिअल यांची यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ भेट:






 कुलगुरु डॉ.राम ताकवले सर जॉन डेनिअल संस्थापक कुलगुरु डॉ.आर .कृष्णकुमार दिनांक :५ मार्च २०१२
 सायं:६.00

Wednesday, February 2, 2011

प्रशासन आपल्या दारी :


प्रशासन आपल्या  दारी:
प्रशासन  जर लोकाभिमुख  असेल तर भौगोलिक अंतर कितीही  असो जनतेचे  श्रम वाचतात व त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या योजना या त्यांच्या पर्यंत पोहचतात.गडचिरोली सारख्या आति दुर्गम भागात  आपले कार्याची
 छाप निर्माण करणारे असेच एक लोकाभिमुख प्रशासनिक आधिकारी .

 







श्री .अतुल पाटणे भा .प्र .से 
जिल्हाधिकारी  गडचिरोली
महाराष्ट्र राज्य ,यांचा हा लेख ख़ास या प्रशासनिक सेवेत आपले करीयर  घडविणाऱ्या साठी


क्लिक करा या लिंक वर  

  




  




I-Governance marathi http://docs.google.com/viewer?

Saturday, January 22, 2011

good insprirational poem

 

 

 

 

 

good inspirational poem                                               

विश्वास नांगरे पाटील भा .पो .से   

पोलीस आधीक्षक ठाणे ग्रामीण  

क्लिक करा या लिंक वर http://www.youtube.com/watch?v=-LYrSqCNlcY&feature=related


 


Friday, January 21, 2011

प्रकाश बर्वे

Wednesday, January 5, 2011

Thought of The Day


We spend our days waiting for the ideal path to appear in front of us,
but we forget  that paths are made by walking not by waiting ........................

Monday, September 13, 2010

Thought of The Day

'Each soul is potentially divine.
The goal is to manifest divinity within.
Do it either by work or worship or psychic control or knowledge,by one or more and be free.'

Swami Vivekananda

from :
Mangesh 14th sept 2010

Saturday, March 13, 2010

NEWS

जयंत कैकिनी यांचे पुरस्कार बातमी
१.http://www.deccanherald.com/content/55399/kannada-poet-jayant-kaikini-chosen.html
२.http://www.newsofap.com/newsofap-7248-25-kannada-poet-jayanth-kaikini-to-get-kusumagraj-national-literary-award-newsofap.हतं
३.http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=54600:2010-03-13-17-29-07&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2l

१३.०३.२०१०

१३.०३.२०१०
यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
द्वि दशक पूर्ति निमित पहिली
महाराष्ट्र राज्य सिंहावलोकन परिषद्
उदघाटन: न्यायमूर्ति पी बी सावंत
कुलगुरु डॉ. कृष्णकुमार
संस्थापक कुलगुरु डॉ राम ताकवले
कुलसचिव डॉ प्रकाश अतकरे
मा.प्रतापदादा भोसले मा. पी बी पाटील मा रावसाहेब कसबे डॉ नीलकंठ देवधर खासदार बालासाहेब विखे पाटील
मा विवेक सावंत मा भास्कर हांडे मा राम प्रधान

न्यायमूर्ति पी बी सावंत

कुलगुरु डॉ. कृष्णकुमार
संस्थापक कुलगुरु डॉ राम ताकवले
कुलसचिव डॉ प्रकाश अतकरे
मा.प्रतापदादा भोसले मा. पी बी पाटील मा रावसाहेब कसबे डॉ नीलकंठ देवधर खासदार बालासाहेब विखे पाटील 
मा विवेक सावंत मा भास्कर हांडे मा राम प्रधान 

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे पाहिले मानकरी कन्नड़ साहितिक श्री जयंत कैकिनी

Thursday, March 11, 2010

१२.०३.२०१०



१२.०३.२०१० 
यशवंतराव  बळवंतराव    चव्हान यांच्या जयन्ती दिनी आभिवादन .
यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

10.03.2010

दिनांक :१०.०३.२०१०

यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कृष्णकुमार यांची कुसुमाग्रज स्मारक भेट.
सोबत विद्यापीठाचे जनसंपर्क आधिकारी जयवंत ख ड ता ले .